आमदार रवींद्र फाटक यांच्यविरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल

0
2492

राजतंत्र न्यूज नेटवर्क/नालासोपारा, दि. 29 : प्रचाराचा कालावधी संपल्यानंतर मतदार संघाबाहेरून आलेले व त्या मतदारसंघाचे मतदार नसलेल्या नेत्यांनी त्या मतदारसंघात उपस्थित राहू नये, असे निवडणुक आयोगाचे निर्देश असताना नालासोपारा येथे आलेले शिवसेनेचे आमदार रवींद्र फाटक यांच्याविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे

मध्यरात्री एक वाजता आमदार रवींद्र फाटक महायुतीचे उमेदवार राजेंद्र गावीत यांचे निवडणूक प्रतिनिधी असलेले जितेंद्र शिंदे यांच्या नालासोपारा पुर्वेतील सेंट्रल पार्क रोड परिसरातील कार्यालयात आले होते. फाटक यांच्यासह 15 ते 20 पदाधिकारी व कार्यकर्ते येथे जमले होते. ही बाब समजताच नालासोपारा विधानसभा मतदारसंघाच्या आचारसंहिता पथकाचे शशिकांत पिंपळे व त्यांच्या सहकार्‍यांनी सदर ठिकाणी पोहोचून व्हिडिओ शुटींग केले. यानंतर पोलीस निरीक्षक डॅनिलय जॉन ब्रेन यांच्या फिर्यादीवरुन आमदार फाटक यांच्याविरुद्ध आज, सोमवारी तुळींज पोलीस स्टेशनमध्ये भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 अन्वये आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.