जव्हार परिसरात आणखी 34 जण भिवंडी येथून परतले असून त्यांची कुटीर रुग्णालयात प्राथमिक तपासणी करुन सर्वांना होम क्वारन्टाईन करण्यात आलेले आहे. ठिकठिकाणी असलेला पोलिस बंदोबस्त चुकवून हे लोक कसे प्रवास करु शकले हा एक चर्चेचा विषय ठरला आहे. हे सर्वजण भिवंडी येथील वीटभट्टीवर काम करीत होते व त्यांच्या मालकाने त्यांना वाऱ्यावर सोडल्यामुळे ते घरी परतल्याची माहिती जव्हारचे उपविभागीय अधिकारी प्रजीत नायर यांनी दिली आहे. संबंधित वीटभट्टी मालकावर गुन्हा दाखल केला जाणार असल्याची माहिती नायर यांनी दिली आहे.
कोणीही खेड्यामध्ये परतल्यानंतर त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. यामुळे बाहेरुन परतले लोक स्वतः आधी रुग्णालयात जाऊन मगच गावात परतत आहे. या सर्वांची नोंद घेऊन त्यांच्यावर आरोग्य यंत्रणेकडून आशा कार्यकर्तींकडून देखरेख ठेवली जाते.
कोरोना संदर्भात दैनिक राजतंत्रच्या Updates साठी खालील Link ला भेट द्या! Let’s fight with CORONA