पालघर जिह्यात रक्तातील प्लाझ्मा देणारा कोरोना वॉरिअर मिळाला! पहिले प्लाझ्मा संकलन पार पडले!

0
3363

वसई, दि. 8: कोव्हीड 19 वर प्रभावी ठरु शकणाऱ्या प्लाझ्मा थेरपीसाठी पालघर जिल्ह्यात पुढाकार घेणाऱ्या साथीया ट्रस्टच्या नालासोपारा ब्लड बॅन्केमध्ये पहिले प्लाझ्मा संकलन यशस्वीरित्या पार पडल्याची माहिती ब्लड बॅन्केचे अध्यक्ष विजय महाजन यांनी दिली आहे.

कोरोनाची विषाणूची बाधा झाल्यानंतर बरे झालेल्या व्यक्तींमध्ये कोरोनाच्या विषाणूंवर मात करणारी रोगप्रतिकारक शक्ती विकसीत होते. अशा पूर्णपणे निरोगी झालेल्या कोरोना वॉरिअरच्या रक्तातील प्लाझ्मा (convalescent plasma) संकलीत करुन ते कोरोनाबाधीताच्या शरीरात सोडले जाते. ह्या उपचार पद्धतीमध्ये कोरोनाबाधीत व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती विकसीत होण्यास साहाय्य होते. डहाणू येथे यशस्वीपणे ब्लड बॅंक चालविणाऱ्या साथीया ट्रस्टच्यस नालासोपारा ब्लड बॅंक शाखेला प्लाझ्मा संकलन करण्यास परवानगी मिळालेली आहे. आज या ब्लड बॅन्केमध्ये कोरोनावर मात करणाऱ्या एका रक्तदात्या कडून प्लाझ्मा संकलन करण्यात आले व ते गरजू रुग्णासाठी देण्यातही आले.

mahanews Loyal Readers Club चे सदस्य व्हा! 300 रुपये भरून आमचे ई वर्गणीदार बना! महत्वाच्या बातम्यांचे Updates मिळवा! त्यासाठी खालील Link ला Click करा! तुम्ही Paytm / Net Banking / Debit Card द्वारे पैसे अदा करु शकता.
https://imjo.in/vq7QpV