पालघर दि 7 : प्लाझ्मा थेरेपीच्या माध्यमातून कोव्हीड-19 च्या रुग्णांवर उपचार करण्यास पालघर जिल्ह्यात परवानगी मिळाली आहे. डहाणू व नालासोपारा येथे कार्यरत साथिया ट्रस्टच्या रक्तपेढीचे अध्यक्ष विजय महाजन यांच्या प्रयत्नांमुळे पालघर जिल्हा हा महाराष्ट्रातील प्लाझ्मा थेरेपीचा वापर करणाऱ्या मोजक्या जिल्ह्यांपैकी एक जिल्हा ठरणार आहे.
विजय महाजन व पतपेढीचे विश्वस्त डॉ. नंदादीप कोकणे यांनी आज जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे सादरीकरण केले. प्लाझ्मा दात्यांनी पुढे आल्यास कोविड-19 च्या रुग्णांना जिवनदान देण्याचे मोठे काम यातून घडणार आहे. जिल्हाधिकारी शिंदे यांनी कोविड-19 बाधीत झाल्यानंतर पूर्णतः बरे झालेल्या व्यक्तींना प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन केले आहे. त्यासाठी प्लाझ्मा दात्यांना विजय महाजन यांच्याशी 9028641886 या क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे.