mahanews MEDIA
डहाणू दि. 24: गणेश विसर्जनाच्या अखेरच्या दिवशी आज पहाटे 3.30 वाजता अतिरिक्त पोलीस अधिक्षक योगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पथकाने हॉटेल पिंक लेक वर छापा टाकून 25 जुगाऱ्यांना अटक केली. यामध्ये बांधकाम विभागाचे कंत्राटदार जितेंद्र चंपानेरकर, बाळू रत्नाकर, टाईल्सचे व्यापारी रोहिदास कुमावत, रामदास उर्फ झिपू झावरे, शंकर शेट्टी यांसह अनेक बड्या नावांचा समावेश आहे. या सर्वांकडून 4 लाख 40 हजार 880 हजार रुपयांची रोख रक्कम, 3 लाख 84 हजार रुपयांचे 26 मोबाईल आणि 69 लाख रुपयांच्या 6 आलिशान गाड्या असा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती चव्हाण यांनी राजतंत्रशी बोलताना दिली. सर्व आरोपींना आज कोर्टापूढे हजर केले जाणार आहे. हॉटेलचा मालक विनोद गुप्ता यालाही आरोपी करण्यात आले असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
आनंद सारस्वत यांनी दुसऱ्या मजल्यावरुन उडी मारली!
पोलीसांनी हॉटेल पिंक लेक वर छापा मारल्यानंतर तेथे उपस्थित असलेला गवताचा व्यापारी आनंद सारस्वत याने हॉटेलच्या दुसऱ्या मजल्यावरुन उडी मारल्याने हाताला फ्रॅक्चर झाले असून त्याला वापी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तो प्रत्यक्ष जुगार खेळतांना न आढळल्याने त्याला आरोपी बनविण्यात आलेले नाही. आनंदने दुसऱ्या मजल्यावरुन उडी का मारली हा प्रश्न गुलदस्त्यात राहिला आहे.
संबंधित बातम्या : डहाणूत जुगारींना अटक ; रामवाडी मित्र मंडळाशी कनेक्शन
- आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
- दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
- स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!
ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा!