पालघर पोलीस दलाचे ऑपरेशन ऑल आऊट; 7 तासांत शेकडो जणांवर केली कारवाई

0
2115
संग्रहित छायाचित्र

पालघर, दि. 17 : जिल्ह्यातील गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी पालघर जिल्हा पोलीस दलातर्फे काल, रात्री 11 ते सकाळी 6 वाजेदरम्यान ऑपरेशन ऑलआऊट अभियान राबविण्यात आले. जिल्हा पोलीस अधीक्षकांसह 39 पोलीस अधिकारी व 290 पोलीस अंमलदारांनी रात्रभर हे अभियान राबवून नियम मोडणार्‍या 34 आस्थापना व 148 वाहनधारकांवर कारवाई तसेच 4 फरार आरोपींना अटक, दारुबंदीचे 5 गुन्हे व 98 निगराणी बदमाशांची एकाच वेळी तपासणी करण्यात आली.

जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिदे यांच्या नेतृत्वाखाली अपर पोलीस अधीक्षक प्रकाश गायकवाड, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस ठाणे प्रभारी अधिकार्‍यांच्या सक्रीय सहभागातुन ऑपरेशन ऑल आऊट राबविण्यात आले. सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व पोलीस अमंलदार हे वरीष्ठ अधिकांर्‍याच्या नेतृत्वाखाली सर्वसमावेशक व आक्रमक कारवाई करुन गुन्हेगांरावर विविध कायद्यांतर्गत परिणामकारक कारवाई करतील, हा या अभियानाचा मुख्य उद्देश होता. त्यानुसार पोलीस अधीक्षक शिंदे यांनी हे अभियान राबविण्याचे निश्‍चित केले व सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना बिनतारी संदेशावरुन सविस्तर सुचना दिल्या. ठरल्याप्रामणे 16 फेबु्रवारी रोजी रात्री 11 वाजता हे अभियान सुरु होऊन दुसर्‍या दिवशी सकाळी 6 वाजता संपले.

हे अभियान एकुण महत्वाच्या 3 टप्प्यांमध्ये पार पाडण्यात आले. यात नाकाबंदी, अ‍ॅक्शन टिम/हंटर टिम- कारवाई पथक व कोम्बिंग ऑपरेशनचा समावेश होता. अशाप्रकारचे अभियान पालघर जिल्ह्यामध्ये प्रथमच अत्यंत प्रभाविपणे राबविण्यात आले. पालघर जिल्हा पोलीस दलाने 16 पोलीस ठाणे हद्दीमध्ये 26 महत्वाच्या ठिकाणी एकाच वेळी नाकाबंदी लावली होती. तसेच पहाटेच्या वेळी गुन्हेगारांच्या आश्रयस्थान असलेल्या एकुण 24 वस्त्यांमध्ये एकाचवेळी कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले.