दि. 28: डहाणू तालुक्यातील वेदान्ता वैद्यकीय महाविद्यालयातील एका डॉक्टरला कोरोनाची बाधा झाली आहे. हा डॉक्टर आयसीयू युनीटमध्ये कार्यरत असून वसतीगृहात निवास करीत होता. तो कोरोना रुग्णांच्या संपर्कात आल्याने तपासणी केली असता अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. यानंतर डहाणू तालुक्यातील कोरोना बाधीतांची संख्या आता 17 झाली आहे.
पालघर जिल्ह्यात आजपर्यंत कोरोनाचे 25 बळी झाले असून त्यातील 22 मृत्यू वसई महानगर क्षेत्रातील असून 1 जण वसई ग्रामीण तालुक्यातील आहे. 2 मृत्यू पालघर तालुक्यातील आहेत. वसई तालुक्यात आतापर्यंत 633 कोरोना बाधीत निष्पन्न झाले आहेत.