डहाणूतील 3 डॉक्टर्स आणि 1 सफाई कामगार कोरोना पॉझिटीव्ह

0
6406

डहाणू शहरातील 4 कोरोना वॉरियर्सच्या चाचणीचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. त्यामध्ये एक सर्जन व कॉर्डीऑलॉजीस्ट यांचा समावेश असून सर्जनच्या गायकॉनॉलीस्ट पत्नीची देखील कोरोना चाचणी करण्यात आली आहे. तपासणी अहवाल हाती येणे बाकी आहे. याशिवाय आशागड येथे सेवा देणाऱ्या एका डॉक्टरचा तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. संबंधितांची 2 हॉस्पीटल्स व निवासस्थाने असलेल्या इमारती प्रतिबंधीत करण्यात आल्या आहेत. डहाणू नगरपरिषदेचा एक सफाई कामगार देखील पॉझिटीव्ह निघाला आहे. ह्या सर्वांना कोरोनाची कुठलीही लक्षणे नाहीत. खबरदारी म्हणून शहरातील डॉक्टर्स व नगरपरिषद कर्मचाऱ्यांच्या कोरोना चाचण्या केल्या जात असून त्यातून हे कोरोना बाधीत निष्पन्न झाले आहेत. 16 ते 19 जुलै दरम्यान नगरसेवकांसाठी देखील चाचण्या घेण्याचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला असला तरी नगरसेवकांनी फारसा प्रतिसाद दिलेला नसल्याचे समजते. (दि. 19 जुलै)