कुवेतचे राजे यांच्या निधनामुळे, त्यांच्या सन्मानार्थ 4 ऑक्टोबर 2020 रोजी राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.
दि. 4 ऑक्टोबर: कुवेतचे राजे महामहीम आमीर शेख सबाह अल-अहमद-अल-जाबेर अल-सबाह यांचे दिनांक 29 सप्टेंबर 2020 रोजी निधन झाले. त्यांना आदरांजली देण्यासाठी म्हणून भारत सरकारद्वारे दिनांक 4 ऑक्टोबर 2020 रोजी देशभरात एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा पाळण्यात येत आहे. त्यामुळेच आज देशभरातील सर्व शासकीय इमारतींवर, जिथे राष्ट्रध्वज फडकत असतो, तो अर्ध्या उंचीवर उतरविण्यात आला आहे. डहाणू नगरपरिषद कार्यालयावरील तिरंगा देखील अर्ध्या उंचीवर फडकत आहे. हा अर्ध्या उंचीवरील ध्वज लोकांच्या निदर्शनास आल्यानंतर याबाबत अनेकांनी mahanews.com कडे विचारणा केली होती.