हिवाळी अधिवेशनात मतदार संघातील प्रलंबित प्रश्न मांडणार! -आमदार निकोले

0
1565

प्रतिनिधी/डहाणू, दि. 17 : नागपूर येथे काल, मंगळवारपासुन हिवाळी अधिवेशन सुरु झाले असुन या अधिवेशनात मतदार संघातील प्रलंबित प्रश्‍न मांडणार असल्याचे डहाणूचे कॉम्रेड आमदार विनोद निकोले यांनी सांगितले.

काल, हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आमदार निकोले नागपूर विधान भवनात उपस्थित झाले. यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, अधिवेशनाच्या कामकाजात सहभागी होण्यासाठी मी फार उत्सूक आहे. माझ्या मतदार संघाबरोबरच राज्यातील शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, कामगार, महिला, युवक आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी कटिबद्ध राहीन अशी भूमिका व्यक्त केली.