जव्हार येथे मोफत कोव्हिड-19 अँटिजेन टेस्ट शिबिराचे आयोजन

जास्तीत जास्त नागरीकांनी शिबिराचा लाभ घेण्याचे नगरपरिषद व आरोग्य विभागाचे आवाहन

0
2355

जव्हार, दि. 23 : तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून जव्हार नगर परिषद व तालुका आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने उद्या, 24 सप्टेंबर रोजी येथील ग्रीन हिल इंग्लिश स्कुल (भाग शाळा) येथे मोफत कोव्हिड-19 अँटिजेन कार्ड टेस्ट शिबिर आयोजित करण्यात आले आहे. थंडी-ताप, सर्दी, खोकला, थकवा, मळमळणे आदी किरकोळ आजार असलेल्या रुग्णांसह कोरोना सदृश लक्षणे असणार्‍या व्यक्ती, गंभीर आजारी रुग्ण व व्यावसायिक मंडळींनी या शिबिरात मुख्यत्वे सहभाग नोंदवून तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन जव्हार नगरपरिषद व तालुका आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.