माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिम जास्तीत जास्त जनतेपर्यंत पोहचविणार -जिल्हाधिकारी डॉ.माणिक गुरसळ

0
2164

पालघर, दि. 22 : माझे कुटुंब माझी जबाबदारी या योजनेचा शुभारंभ महाराष्ट्रात झाला असून ही योजना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवण्यासाठी जनजागृती करण्यात यावी, असे आवाहन राज्याच्या मुख्य सचिवांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देऊन ही योजना पालघर जिल्ह्यातील जास्तीत जास्त जनतेपर्यंत पोहोचवणार, असे जिल्हाधिकारी एस. गुरसळ म्हणाले. पालघर जिल्ह्यात दोन टप्प्यात हा उपक्रम राबविला जाणार असून जिल्ह्यातील चार लाख ९५ हजार कुटुंबीयांची तपासणी करण्यात येणार आहे. तसेच याकामी ७४० पथकांकडून कुटुंब सदस्यांची माहिती संकलित केली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली.

पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. के. सालीमठ यांनी जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांपर्यंत ही योजना पोहोचावी व या योजनेची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी सध्या सुरू असलेल्या सर्व ऑनलाईन शाळांमधून सर्व शाळांनी या विषयावर तासिका घेऊन विद्यार्थ्यांना शिक्षकांनी मार्गदर्शन करावे, अशी सुचना केली आहे.