विद्यार्थ्यांनी नागरिक शास्त्राचा अभ्यास करावा जबाबदार नागरिक होण्यासाठी प्रयत्न करावेत – संजीव जोशी

0
1463

mahanews_EPAPER_060818_1_100817            डहाणू दि. ४ : विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांनी नागरिक शास्त्राचा अभ्यास करावा; त्याद्वारे भारतीय संविधान देखील समजून घ्यावे आणि जबाबदार नागरिक होण्यासाठी प्रयत्न करावेत असे मार्गदर्शन दैनिक राजतंत्रचे संपादक संजीव जोशी यांनी नागझरी येथे बोलताना केले.
शांतीवन शेतकरी सेवा मंडळ संचलित नागझरी (तालुका डहाणू) येथील आदिवासी आश्रमशाळेत भारतीय संविधानाची तोंडओळख या विषयावर ते बोलत होते. यावेळी संस्थेचे विश्वस्त फादर जो, डहाणू एज्युकेशन ट्रस्टचे उपाध्यक्ष सुधीर कामत, माजी सैनिक विवेक करकेरा उपस्थित होते.
संजीव जोशी यांनी समाजामध्ये भारतीय संविधानाची तोंडओळख करुन देण्याचे कार्य हाती घेतले असून त्यांचे हे या विषयावरील 28 वे व्याख्यान होते. त्यांनी विद्यार्थ्यांना अतिशय सहज व सोप्या भाषेमध्ये संविधानाची मूलभूत माहिती दिली. आदिवासी भागातील विद्यार्थ्यांनी पेसा सारखा कायदा देखील समजून घेतला पाहिजे आणि गावाच्या विकासास हातभार लावला पाहिजे असेही प्रतिपादन जोशी यांनी केले.