बोईसर : ट्रेनमध्ये अडकलेल्या प्रवाशांसाठी जैन बांधवांनी केली जेवणाची सोय

0
2434

BOISAR TRAIN PRAVASHIवार्ताहर
            बोईसर, दि. 11 : अतिवृष्टीमुळे बोईसर स्टेशनवर अडकून पडलेल्या लखनऊ बांद्रा एक्स्पे्रेस व डहाणू-पनवेल मेमोतील प्रवाशांसाठी येथील जैन बांधवांनी नाश्ता, जेवण, पाणी व औषधांची सोय करुन माणुसकीचे दर्शन घडवले. काल, रेल्वे स्थानकात प्रवाशी अडकल्याची माहिती मिळाल्यानंतर बोईसरमधील जैन समाज सल्लागार महावीर सोळंकी, समाज अध्यक्ष मुकेश जैन, राकेश खोखावत, अरविंद कोठीफोडा, नरेश भोगर, जितेंद्र दोशी, अरविंद जैन, दिपक घातावत, प्रकाश ईटोदिया, आशिष जैन, पप्पू जैन, फोरदोस, संतोष वर्मा यांच्यासह 70 ते 75 कार्यकर्त्यांनी एकत्र येत या प्रवाशांची सेवा केली. यावेळी 200 किलो खिचडी, 2 हजार अर्ध्या लीटर पाण्याच्या बाटल्या, 20 लिटरचे 25 पाण्याचे कॅन, 200 डजन केळी व फळे तसेच काही आजारी प्रवाशांसाठी औषधांची सोय केली.