डहाणू: चोरांच्या अफवांमुळे जमावाने 3 जणांना ठार केले

0
1656

डहाणू दि. 17: अखेर सर्वत्र पसरलेल्या चोर फिरत असलेल्या अफवांच्या पार्श्वभूमीवर डहाणू तालुक्यातील गडचिंचले येथे 3 वाटसरूंना जमावाने यमसदनी पाठवले आहे. मारुती इको गाडीमधून प्रवास करणारे 2 प्रवासी आणि त्यांच्या चालकावर रस्त्यावर जमलेल्या जमावाने अमानुष हल्ला चढवित तिघांना जागीच ठार केले आहे. कासा पोलिसांनी स्थानिक जिल्हा परिषद सदस्य काशिनाथ चौधरी यांच्या सह घटनास्थळी जाऊन जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र जमावाला शांत करण्यात अपयश आले. लोकांनी पोलिसांच्या गाडीवर देखील हल्ला चढवला आहे. हे प्रवासी खानवेल येथून त्र्यंबकेश्वर येथे जात असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

mahanews Loyal Readers Club चे सदस्य व्हा! 300 रुपये भरून आमचे ई वर्गणीदार बना! महत्वाच्या बातम्यांचे Updates मिळवा! त्यासाठी खालील Link ला Click करा! तुम्ही Paytm / Net Banking / Debit Card द्वारे पैसे अदा करु शकता.
https://imjo.in/vq7QpV

प्रत्यक्ष मारहाणीचे फोटो चित्त विचलित करु शकतात. या करिता दिले नाहीत.