वकिलाचा अपघाती मृत्यू – गडचिंचले हत्याकांडात मांडणार होता पिडीतांची बाजू

0
2582

दि. 14: भाईंदर येथील वकील दिग्विजय त्रिवेदी यांचा मेंढवणच्या खिंडीत अपघाती मृत्यू झाला आहे. ते काल डहाणू न्यायालयात जमावाच्या हल्ल्यात ठार झालेल्या साधूंच्या पक्षात बाजू मांडण्यासाठी येत असताना सकाळी 10 च्या सुमारास हा अपघात झाला. त्यांच्या सोबत प्रवास करणारी त्यांची सहकारी गंभीर जखमी झालेली आहे. त्रिवेदी हे एम एच 04 एच एम 1704 क्रमांकाच्या कारने येत असताना कारवरील ताबा सुटला व ती रस्त्याच्या कडेला उलटली.

दैनिक राजतंत्रचा विशेष लेख अवश्य वाचा! – माननीय मुख्यमंत्री, पालघर जिल्ह्यात All is NOT Well! SP गौरव सिंगांची उचलबांगडी करा!

दरम्यान, गडचिंचले हत्याकांड प्रकरणी आरोपींची संख्या आता 141 झाली आहे. त्यातील 9 अल्पवयीन आरोपींच्या संख्येत आता 1 ने भर पडली आहे. एकूण 10 जण आता भिवंडी येथील बाल सुधार गृहात आहेत. आज खूनाच्या 6 नव्या आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना 19 मे पर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. आधीच अटकेत असलेल्या 106 जणांपैकी 5 जणांना न्यायालयाने 16 मे पर्यंत पोलिस कोठडी दिली असून, उर्वरीत 101 जणांना न्यायालयीन कोठडीत पाठवले असले तरी त्यातील, 40 जणांना तिसऱ्या गुन्ह्यात (आरोपींना अटक करताना हल्ला करणे) अटक करण्यात आली असून त्यांना 18 मे पर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. त्या शिवाय 19 आरोपी आधीच पोलिस कोठडीत पाठविण्यात आले आहेत.

हे देखील वाचा: – डहाणू पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक गोविंद ओमासे यांची तृतीयपंथीयांकडून खंडणी वसुलीची नामर्दानगी

mahanews Loyal Readers Club चे सदस्य व्हा! 300 रुपये भरून आमचे ई वर्गणीदार बना! महत्वाच्या बातम्यांचे Updates मिळवा! त्यासाठी खालील Link ला Click करा! तुम्ही Paytm / Net Banking / Debit Card द्वारे पैसे अदा करु शकता.
https://imjo.in/vq7QpV

अपघातात क्षतीग्रस्त झालेली कार