करोना : पालघर जिल्ह्यातही परिस्थिती बिघडतेय; आज तब्बल ‘इतके’ रुग्ण वाढले!

0
5413

पालघर तालुक्यात सर्वाधिक रुग्णवाढ

पालघर, दि. 18 : करोना विषाणूचा भारतात संसर्ग होण्याला आता 1 वर्षाचा अवधी लोटल्यानंतरही या विषाणूचा धोका अजुनही कायम आहे. चिंताजनक बाब म्हणजे महाराष्ट्र राज्यात करोना रुग्णवाढीच्या संख्येने पुन्हा एकदा वेग घेतला असुन राज्यात करोनाची दुसरी लाट आल्याचे चित्र आहे. पालघर जिल्ह्यातही करोना रुग्णांचा आकडा मोठ्या संख्येने वाढत असुन जिल्ह्यात आज तब्बल 76 नवे रुग्ण आढळून आले आहेत. यात पालघर तालुक्यातील सर्वाधिक 46 रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील करोना परिस्थिती बिघडत चाचली असल्याचे दिसुन येते.

जिल्हा माहिती कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, आज पालघर जिल्ह्यात एकुण 76 रुग्णांची वाढ झाली आहे. यात पालघरनंतर वाड्यातील 13, मोखाड्यातील 11 व डहाणूतील सहा रुग्णांचा समावेश आहे. आजच्या आकडेवारीनुसार, पालघर जिल्ह्यात आता अ‍ॅक्टीव रुग्णांची संख्या 318 वर पोहोचली असुन त्यात दररोज वाढ होत आहे. दरम्यान, रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता जिल्हा प्रशासनाकडून वारंवार करोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.