
https://imjo.in/vq7QpV (तुम्ही Direct 9822283444 ह्या क्रमांकावर Paytm देखील करु शकता)
डहाणू दि. 28: पालघर जिल्ह्यातील कोरोना बाधितांसाठी दिलासादायक बातमी हाती आली आहे. डहाणूतील उप जिल्हा रुग्णालयात ” कोव्हीड- 19 ” चाचणीची सुविधा उपलब्ध झाली आहे. कालपासून हे केन्द्र कार्यान्वीत झाल्याची माहिती रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. बालाजी हिंगणे यांनी दिली आहे. सुरुवातीला येथे दररोज 20 चाचण्या केल्या जाणार आहेत. उप जिल्हा रुग्णालयाच्या आवारात आधीच उभ्या राहिलेल्या मॉडर्न रुरल हेल्थ सेंटरच्या सुसज्ज इमारतीमध्ये हे केंद्र स्थापित करण्यात आले.
ह्यापूर्वी पालघर जिल्ह्यातून घशाचे नमुने तपासणीसाठी मुंबईत पाठवावे लागत होते. तपासणी अहवाल किमान 3 ते 4 दिवसांत प्राप्त होत असे. हा कालावधी कमी झाल्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय करणे सोईचे ठरणार आहे. तपासणी केंद्राची सुविधा उपलब्ध केल्याबद्दल पालघर जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे, सहाय्यक जिल्हाधिकारी सौरभ कटीयार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कांचन वाणेरे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र केळकर, आरसीएमआरचे संचालक डॉ. महाले ह्यांचे अभिनंदन केले जात आहे.