गाव तिथे शाखा व घर तिथे शिवसैनिक’ संकल्पना राबविणार – उपजिल्हा प्रमुख सुनिल पाटील

0
1474

mahanews_EPAPER_050418_4_050419प्रतिनिधी

          वाडा, दि. ०४:  तालुक्यात जिथे जिथे शिवसेनेच्या शाखांची कामं थंडावली आहेत अशा शाखा पुनरुज्जीवित करून व कार्यकर्त्यांमधील मतभेद संपुष्टात आणून तालुक्यातील शिवसेना नव्या उमेदीने उभी करण्याचा संकल्प नवनिर्वाचित उपजिल्हा प्रमुख सुनिल पाटील व तालुका प्रमुख उमेश पटारे यांनी   तालुक्यातील कुडूस जिल्हा परिषद गटातील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्याच्या मेळाव्यात बोलतांना व्यक्त केला. येत्या काही दिवसांत वाडा तालुक्यातील उर्वरित पाचही जिल्हा परिषद गटांचा मेळावा घेऊन त्या त्या विभागातील शिवसैनिकांच्या व पदाधिकाऱ्यांच्या समस्या समजून घेऊन संघटना वाढीच्या दृष्टीने प्राधान्याने प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. 

मेळाव्या दरम्यान विभागातील पदाधिकारी व शिवसैनिकांनी आपापल्या क्षेत्रातील पक्षांतर्गत येणाऱ्या समस्या, रिक्त पदं, व आवश्यक असणारे संघटनेच्या माध्यमातून सहकार्य व सूचना मांडल्या व त्या संदर्भात उपस्थित पदाधिकारी यांनीही त्या समस्या सोडविण्यासाठी वचनबद्ध असल्याचे जाहीर केले.           भिवंडी ग्रामीण विधानसभेचे आमदार शांताराम मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या मेळाव्यास  महिला आघाडीच्या माजी जिल्हा संघटक ज्योती ठाकरे, उप संघटक संगिता ठाकरे, विधानसभा संघटक मनाली फोडसे, तालुका संघटक रेश्मा पाटील, उपतालुका प्रमुख तुषार यादव, जेष्ठ कार्यकर्ते व वाडा शहर प्रमुख प्रकाश केणे, युवासेनेचे तालुका अधिकारी निलेश पाटील, जेष्ठ शिवसैनिक चंद्रकांत पष्टे, विभाग प्रमुख जनार्दन भेरे, कुडूस शहर प्रमुख राजा शेटे, आदींसह अनेक जेष्ठ पदाधिकारी, कुडूस विभागातील शिवसैनिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने या मेळाव्यास उपस्थीत होते.