उचाट येथील मराठी शाळेतील डिजिटल रूमचे उदघाटन.

0
1752

kudusप्रतिनिधी
कुडुस, दि. 17 : उचाट हया वाडा तालुक्यातील पुनर्वसित गावातील जिल्हा परिषद शाळेतील डिजिटल रूमचे उदघाटन वाडा तालुका पंचायत समिती सभापती अश्विनी शेळके यांच्या झाले.
हा कार्यक्रम जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात पार पडला. या वेळी बोलतांना शेळके म्हणाल्या, उचाट हे गाव शिक्षण प्रेमी आहे. येथील ज्यूनियर कॉलेज पर्यतची प्रगती अल्पावधीतच या गावाने केली असून मी येथील माजी विद्यार्थिनी असल्याने मी येथील ग्रामस्थांचे प्रयत्न अनुभवले आहेत. पालकांनी सुजाणपणे चांगले गुण व मार्गदर्शन मुलांना दिले तर मुले निश्चितच यश मिळवतात. अशा शब्दांत त्यांनी यावेळी पालकांना देखील मार्गदर्शन केले. तसेच उपसभापती जगन्नाथ पाटील व सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत भोईर यांनीही उचाट येथील नागरिकांचे शाळा डिजिटल बनविण्यात मोलाचे सहकार्य केल्या बद्दल आभार मानले. यावेळी केंद्र प्रमुख गुरूनाथ पष्टे यांनी स्मार्ट शाळा बनविण्यासाठी आवश्यक असणार्‍या गोष्टी व त्यामुळे अध्यापनात होणारा बदल याविषयी विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले.
शाळा डिजिटल बनविण्यासाठी उद्योजक संदीप वखारीया यांनी टॅब, संगणक संच, व 11 हजार रूपये, गावडाई झोलाई ट्रस्ट कडून 10,000 रूपये, महिला बचत गटाकडून 8000 रूपये, ग्रामपंचायती कडून प्रोजेक्टर व टीव्ही. व काही वस्तू व प्रा. आर. एम.मोहिते यांनी वॉटर फिल्टर मिळवून दिले. कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून सभापती अश्विनी शेळके, उपसभापती जगन्नाथ पाटील, उद्योजक संदीप वखारिया, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मनोज सुर्वे, सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत भोईर, उचाट शिक्षण संस्थेचे अध्यक्ष यशवंत मोरे, प्रभाकर मोरे, रघुनाथ मोरे, रविंद्र मोरे, प्राचार्य के. एल. पाटील. मोहिते सर, प्रितेश पटेल,ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक यशवंत मोरे यांनी तर सूत्रसंचालन एन.जे. पाटील सरांनी केले.