डहाणू दि. 22 ऑक्टोबर: डहाणू तालुक्यातील घोलवड पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश सोनवणे यांच्या 20 वर्षीय मुलाचा तिसऱ्या मजल्यावरुन पडून आकस्मिक मृत्यू झाला आहे. प्रज्वल असे मृत मुलाचे नाव असून तो नाशिक येथे कृषी पदविका अभ्यासक्रम पूर्ण करीत होता. सध्या लॉक डाऊन कालावधीत शैक्षणिक संस्था बंद असल्यामुळे तो बोर्डी येथे वडिलांसोबत रहात होता.
सोनावणे हे बोर्डी झाई मार्गावरील सिद्धिविनायक कॉम्प्लेक्स या 3 मजली इमारतीमध्ये वास्तव्यास आहेत. आज पहाटे 6 वाजण्याच्या सुमारास प्रज्वल याच इमारतीखाली रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे आढळले. सोनावणे यांनी त्वरित प्रज्वलला डॉक्टरांकडे नेले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. हा अपघात आहे किंवा आत्महत्या याबाबत पोलीस तपास करीत आहेत.