
डहाणू दि. 21: डहाणू शहरातील महालक्ष्मी प्लाझा (मल्याण) या इमारतीमधील ‘ जलसा ‘ कॅफेचे संचालक विशाल वाडेकर यांच्यावर रस्त्यावरील कुत्र्याला मारहाण केल्याप्रकरणी डहाणू पोलीसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 428 व प्रिव्हेन्शन ऑफ क्रूएल्टी टू ॲनिमल ॲक्ट,1960 मधील कलम 11(1) व मुंबई पोलीस अधिनियमाच्या कलम 119 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. विशालच्या मारहाणीत कुत्रा लंगडू लागल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. गुन्हा प्राणी मित्राने दाखल केला किंवा कुत्र्याच्या मालकाने दाखल केला, याबाबत समजू शकलेले नाही.
विशाल यांनी 16 फेब्रुवारी रोजी आपल्या कॅफे समोर बसलेल्या कुत्र्याला लाठीने मारहाण केल्याचा आरोप असून याबाबतचा व्हिडीओ सोशल मिडीयावरुन व्हायरल झाला होता. यावर ” कॅफेसमोर भटक्या कुत्र्यांचा उपद्रव झालेला असून ही कुत्री कॅफेमध्ये घुसतात. त्यांच्यापासून गिऱ्हाईकांना देखील त्रास व भिती वाटते. याबाबत नगरपालिकेकडे देखील तक्रार केली. प्राणी मित्रांकडे देखील कैफियत मांडली. माझ्यासमोरील कुत्र्याला रॅबीज झाला असल्याची मला शंका होती. त्यामुळे मी त्याला तिथून हाकलले ” असा खूलासा विशाल यांने केला होता.
- एखाद्या 10 रुपयेपेक्षा जास्त किंमतीच्या जनावराला ठार केल्यास किंवा त्याला विकलांग केल्यास भारतीय दंड संहितेच्या कलम 428 प्रमाणे गुन्हा घडतो. हा दखलपात्र व जामिनपात्र गुन्हा आहे.
- आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
- दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
- स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!