राष्ट्रवादीच्या महिला कॉंग्रेसच्या  डहाणू शहर अध्यक्षपदी रेणुका राकामुथा

0
2225

 

mahanews_EPAPER_040418_1_090453राजतंत्र न्युज नेटवर्क
       राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या डहाणू शहराच्या महिला अध्यक्षपदावर माजी नगरसेविका सौ. रेणुका शैलेश राकामुथा यांची निवड करण्यात आली आहे. रेणुका या २०१२-१७ या कालावधीत डहाणू नगरपरिषदेच्या सदस्या होत्या. या कालावधीत त्या ३ वर्षे शिक्षण समितीच्या व १ वर्ष महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती होत्या. या कालावधीत त्या धडाडीच्या लोकप्रतिनिधी म्हणून ओळखल्या जात होत्या. डिसेंबर २०१७ मध्ये झालेल्या डहाणू नगरपरिषद निवडणूकीत रेणुका या अवघ्या १७ मतांनी पराभूत झाल्या होत्या