जव्हार-वाडा-विक्रमगड रोडवरील जुनी जव्हार समज बुधवारी रात्री राजू अंभिरे यांच्या पोल्ट्रीसमोरील वळणावर टेम्पोचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात होऊन यात सागर मच्छी (वय २३) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर कौशिक रायकर व संजय दुबळा हे दोघे गंभीर जखमी झले असून त्यांना अधिक उपचारासाठी सेल्वास येथील भक्ती वेदांत रुग्णालयात हलविण्यात आले आहे