न लागणाऱ्या Helpline नंबरमुळे पालघर जिल्ह्यात अडकलेल्या मजूरांची उपेक्षा

0
2860

दि. 2 मे: सरकारने जिल्ह्याबाहेर व राज्याबाहेर जाणाऱ्यांसाठी परवानगी देण्याचा निर्णय दिल्यानंतर महाराष्ट्रात फसलेल्या परराज्यांच्या मजूरांच्या आशा पल्लवीत झालेल्या असल्या तरी प्रत्यक्षात प्रवास शक्य होईल किंवा नाही याबाबतची अनिश्चितता संपलेली नाही. सरकारने यासंदर्भात नोडल अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी यांचे मोबाईल क्रमांक जाहीर केले असले तरी हजारो लोकांचे फोन जिल्हाधिकारी कसे उचलणार हा प्रश्न उपस्थित झाला. त्यानंतर आज Online application ची Link उपलब्ध करण्यात आली आहे. फसलेले अनेक मजूर हे स्मार्टफोन वापरत नाहीत. त्यातही कोणाची मदत घेतली तरी अनेक अडचणी येत आहेत. अडचणी सोडविण्यासाठी पालघर जिल्ह्यातर्फे देण्यात आलेले 02525252520 किंवा 02525297474 Helpline नंबर लागतच नाहीत. यामुळे लोकांमध्ये अस्वस्थता पसरली असून लोकांना मदत करण्यासाठी तालुका पातळीवर उचलले जाणारे फोन नंबर उपलब्ध करावेत अशी लोकांची मागणी आहे.

जिल्ह्याबाहेर किंवा राज्याबाहेर जायचे आहे? Online Link उपलब्ध