पालघर जिल्ह्यात कोरोनाचा 4 था बळी; 21 पॉझिटीव्ह

0
1701

पालघर, दि. 6 एप्रिल: जिल्ह्यात आतापर्यंत 21 जणांचे तपासणी अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. त्यातील मृत्यूंची संख्या आता 4 झाली आहे. यातील 3 मृत्यू वसई महानगर क्षेत्रातील आहेत, तर एक मृत्यू पालघर तालुक्यातील आहे. चौथा बळी नालासोपारा येथील 38 वर्षीय महिला ठरली असून, तीचा नायर हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाल्याचे सुत्रांकडून समजते. तथापि जिल्हा प्रशासनाने तपशील जाहीर केलेला नाही.

145 तपासणी अहवाल निगेटिव्ह: एकूण 286 जणांचे घशाचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले असून, आज रोजी पर्यंत, 145 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. 120 अहवाल प्राप्त होणे बाकी आहे. 286 पैकी 30 जण परदेशात जाऊन आलेले, 190 कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांच्या निकट संपर्कात आलेले व 66 जण कोरोनाची लक्षणे दिसणारे मात्र परदेशी न गेलेले अथवा अशा व्यक्तींच्या संपर्कात न आलेले आहेत

होम क्वारन्टाईन चा भंग करणाऱ्या 182 लोकांना सक्तीचे क्वारन्टाईन: वसई तालुक्यात होम क्वारन्टाईन केलेल्या 182 जणांनी आदेश न पाळल्यामुळे त्यांना सक्तीने इंस्टीट्यूशनल क्वारन्टाईन करण्यात आले होते. त्यातील 81 लोकांना सोडण्यात आले आहे.

सध्या 39 रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत. कस्तुरबा रुग्णालय (मुंबई) – 3; ठाणे येथील जिल्हा सामान्य रुग्णालय – 6; जसलोक (मुंबई) – 2; एमजीआरएम (पवई) – 3; रहेजा हॉस्पिटल (मुंबई) – 1; बोळिंज हॉस्पिटल (वसई) – 20 (-ve); डहाणू उप जिल्हा रुग्णालय – 2 (अहवाल प्राप्त नाही); रिद्धीविनायक हॉस्पिटल (नालासोपारा) 1; सेव्हन हिल्स हॉस्पिटल 1.

कोरोना संदर्भात दैनिक राजतंत्रच्या Updates साठी खालील Link ला भेट द्या! Let’s fight with CORONA

  • 101 जणांना इन्स्टीट्यूशनल क्वारन्टाईन केलेले आहे.
  • 190 जणांना कोरोना बाधीत व्यक्तीच्या निकट संपर्कात आल्याने इन्स्टीट्यूशनल क्वारन्टाईन केलेले आहे.
  • 39 रुग्ण लक्षणे आढळल्यामुळे रुग्णालयात दाखल.
  • 286 रुग्णालयात दाखल सर्वांच्या घशाचे नमुने घेतलेले आहेत.
  • 145 नमुने निगेटिव्ह.
  • 120 तपासणी अहवाल प्राप्त होणे बाकी बाकी आहे.
  • 21 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह. व त्यातील 4 पॉझिटीव्ह रुग्णांचा मृत्यू.