श्रीनिवास वनगांना पालघर, तर विलास तरेंने बोईसर मतदार संघातून दाखल केला अर्ज

वार्ताहर/बोईसर, दि. 3 : कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाघ आला… येऊन येऊन येणार कोण शिवसेनेशिवाय आहे कोण… अशी घोषणाबाजी व ढोल ताश्याच्या गजरात शिवसेनेचे पालघर विधानसभा मतदार संघाचे उमेदवार श्रीनिवास वनगा व बोईसर विधानसभा मतदार संघाचे उमेदवार विलास तरे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी शिवसेनेचे पालघर जिल्हा संपर्क प्रमुख रवींद्र फाटक, खासदार राजेंद्र गावित, जिल्हा प्रमुख राजेश शहा, जिल्हा महिला संघटक ज्योती मेहेर, जिल्हा समन्वय केदार काळे, भाजपचे सुजित पाटील, आरपीआयचे जिल्हा अध्यक्ष सुरेश जाधव, जिल्हा परिषद उपाध्यक्ष निलेश गंधे, विधानसभा क्षेत्र प्रमुख वैभव संखे, तालुका प्रमुख विकास मोरे, निलम म्हात्रे, सभापती मनीषा पिंपळे आदींसह महायुतीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
