पालघर, दि. 22 : राष्ट्रीय एकात्मता तसेच युवांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी शासनामार्फत दरवर्षी जिल्हा, विभागीय, राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावर युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार पालघर जिल्ह्यात जिल्हास्तरीय युवा महोत्सव या योजनेअंतर्गत जिल्हा, विभाग व राज्यस्तरीय युवा महोत्सवाचे ऑनलाईन (व्हर्च्युअल) आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवामध्ये सहभागी होऊ इच्छिणार्या युवकांचे वय 15 ते 29 वर्षाच्या आतील असणे आवश्यक आहे. करोना महामारीमुळे यंदा हा महोत्सव ऑनलाईन होणार आहे.
- युवा महोत्सवामध्ये खालील कलाप्रकारांचा समावेश करण्यात आला आहे.
1) सांघिक बाबी :- लोकनृत्य, लोकगीत.
2) वैयक्तिक बाबी :- एकांकिका (इंग्रजी व हिंदी).
3) शास्त्रीय गायन :- हिंदुस्तानी, कर्नाटकी.
4) वकृत्व :- ऐनवळी देण्यात येणारा विषय.
5) शास्रीय नृत्य:- मणिपुरी, भरतनाट्यम, कुची पुडी, कथक, ओडिसा.
(6) शास्त्रीय वादन :- सितार, बासरी, तबला, विणा, मृदंग, हार्मोनियम.
तरी या महोत्सावामध्ये सहभागी होण्याकरिता आपले प्रवेश अर्ज 24 डिसेंबर 2020 पर्यंत पालघर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात सादर करावेत. ज्या युवक-युवतीचे व संस्थांचे प्रवेश अर्ज प्राप्त होतील त्यांना ऑनलाईन लिंक व जिल्हास्तरीय स्पर्धाची तारिख कळविण्यात येईल. तसेच अधिक माहितीसाठी श्रीम. विद्या भदाणे यांच्या 9561392699 किंवा 9321413340 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी शरद कलावंत यांनी केले आहे.