वसईत सव्वा दोन किलो गांजासह दोघांना अटक

0
2532
संग्रहित छायाचित्र

वसई, दि. 22 : वसई तालुका हद्दीत मोडणार्‍या मुंबई-अहमदाबाद महामार्गवरील चिंचोटी फाट्याजवळ पोलिसांनी सव्वा दोन किलो गांजासह दोघांना ताब्यात घेतले आहे. मिथुन अशोक वर्मा (वय 31 वर्षे, रा. नायगाव पुर्व, वसई) व अविनाश बिजेश सिंग वय (26 वर्षे, रा. नालासोपारा, वसई) अशी अटक करण्यात आलेल्या तरुणांची नावे असुन हे दोघे स्कुटरच्या डिक्कीत लपवून गांजाची बेकायदेशीररित्या वाहतूक करत होते. काल, 21 जुलै रोजी संध्याकाळी 7.50 वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जप्त केलेल्या गांजाची किंमत सुमारे 33 हजार 750 रुपये ऐवढी आहे. दरम्यान, याप्रकरणी दोन्ही आरोपींविरोधात वालीव पोलीस स्टेशनमध्ये एन.डी.पी.एस. कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन अधिक तपास सुरु आहे.