राजतंत्र न्युज नेटवर्क
डहाणू दि. २५ : येथील मल्याण मराठी शाळेच्या शिक्षिका स्मिता ओगले सोहोनी यांच्या मातोश्री श्रीमती निर्मला दत्तात्रय ओगले यांचे २३ जुलै रोजी वृद्धापकाळाने निधन झाले आहे. त्या ७८ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात ५ विवाहित मुली, जावई व नातवंडे असा परिवार आहे. मागील वर्षभर त्या फुफ्फुसाच्या संसर्गाने आजारी होत्या.
दिवंगत निर्मला या १० वी पर्यंत शिक्षण घेऊन विवाहानंतर डहाणूत आल्या. विवाहानंतर संसाराचा गाडा हाकत हाकत त्यांनी बी. ए., एम. ए. चे शिक्षण घेतले व बी. एड. आणि सी. पी. एड. चे शिक्षण घेऊन येथील प्रख्यात अशा के. एल. पोंदा हायस्कूलमध्ये शिक्षिका झाल्या. ३६ वर्षे शिक्षिका म्हणून सेवा केल्यानंतर त्या निवृत्त झाल्या. मितभाषी व मनमिळाऊ स्वभावामुळे त्या विद्यार्थ्यांबरोबरच परिसरात लोकप्रिय होत्या. त्या ओगलेबाई या नावाने ओळखल्या जात होत्या.
