करोना अपडेट : पालघर तालुक्यातील दैनंदिन रुग्णांचा आकडा 300 वर; जिल्ह्यात आज एकुण 479 रुग्णांचे करोना अहवाल पॉझिटिव्ह

0
2724

पालघर, दि. 15 : राज्यातील इतर जिल्ह्यांप्रमाणे पालघर जिल्ह्यातही (ग्रामीण) करोनाची स्थिती गंभीर बनत असुन आज, गुरुवारी जिल्ह्यात एकुण 479 रुग्णांची भर पडली आहे. विशेष म्हणजे एकट्या पालघर तालुक्यात आज 301 रुग्णांचे करोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्हा माहिती कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, पालघर पाठोपाठ विक्रमगडमध्ये 71, जव्हारमध्ये 63, वसईत (ग्रामीण) 38 तर तलासरीत 6 नवे रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान, डहाणू, वाडा व मोखाड्यात आज एकही पॉझिटिव्ह रुग्णाची नोंद झालेली नाही. आजच्या रुग्णसंख्येनंतर पालघर (ग्रामीण) जिल्ह्यातील करोना लागण झालेल्या रुग्णांची संख्या 21 हजार 912 वर पोचली असुन यातील 17 हजार 926 रुग्णांनी करोनावर यशस्वी मात केली आहेे. तर आतापर्यंत 343 रुग्ण दगावले आहेत. जिल्ह्यात आता एकुण 3 हजार 643 अ‍ॅक्टिव रुग्णांवर उपचार सुरु आहेत.