वसई, दि. 11 : महिन्याभरापुर्वीच लग्न झालेल्या नवविवाहितेची पतीने नायलॉन दोरीने गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना वसई तालुक्यात घडली आहे. या घटनेनंतर आरोपी पती फरार असुन पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
पीटीआय या इंग्रजी वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, वसई तालुक्यातील तुळींज पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे. येथील 24 वर्षीय आरोपी तरुणाचा मागील महिन्यात 7 डिसेंबर रोजी विवाह झाला होता. मात्र लग्नाच्या काही दिवसानंतरच मतभेदांमुळे त्याचे पत्नीसोबत वाद होऊ लागले. या वादातून त्याने नायलॉन दोरीने पत्नीची गळा आवळून हत्या केली. मृत महिलेच्या भावाने तुळींज पोलीस स्टेशनमध्ये याबाबत तक्रार केल्यानंतर पोलिसांनी आरोपीवर भारतीय दंड विधान संहितेचे कलम 302 नुसार हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच या घटनेनंतर आरोपी फरार असल्याचे समजते असुन पोलीस त्याच्या मागावर आहेत.