पालघर जिल्ह्यात कोरोनाचा 5 वा बळी

0
2472

(12.04.2020) पालघर जिल्ह्यात आज कोरोनाचा 5 वा बळी गेला आहे. नालासोपारा येथील रिद्धीविनायक हॉस्पिटलमध्ये हा मृत्यू झाला असून विरार वसई महानगर क्षेत्रातील हा 4 था मृत्यू आहे. जिल्ह्यातील कोरोना पॉझिटीव्हचा आकडा देखील 2 ने वाढून 39 झाला आहे. यामध्ये वसई तालुक्यातील 37 रुग्णांचा समावेश असून 4 जणांचा मृत्यू व 1 जण आजारातून बरा झाला आहे. उर्वरीत 2 जण हे पालघर तालुक्यातील असून, त्यातील 1 जणाचा मृत्यू झाला आहे. वसई वगळता अन्य कुठल्याही तालुक्यांत नवा कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळलेला नाही.

आमच्या लेखणीला बळ द्या!
▪ 300 रुपये भरून आमचे ई वर्गणीदार बना! आमच्या Loyal Readers Club चे सदस्य व्हा! महत्वाच्या बातम्यांचे Updates मिळवा! त्यासाठी खालील ▪ Link ला Click करा!
https://imjo.in/vq7QpV