झाई व आशागड येथील आश्रमशाळांमध्ये क्वारन्टाईन करणार!

डहाणू दि. 12: मच्छीमारीसाठी गुजरात हद्दीत असलेले व लॉक डाऊनमुळे तेथेच अडकलेले मच्छीमार खलाशी महाराष्ट्रात परत आणण्यास सुरुवात झाली आहे. हे खलाशी वेरावळ येथे होते व काही दिवसांपूर्वी समुद्रमार्गे उंबरगांव पर्यंत आले होते. मात्र तेथे त्यांना गुजरात पोलिसांनी व स्थानिकांनी खाली उतरण्यास मज्जाव केला होता. त्यांना परत आणण्याचे महाराष्ट्र प्रशासनाचे प्रयत्न असफल ठरले होते. उंबरगांव येथून त्यांची रवानगी पुन्हा वेरावळ बंदरात करण्यात आली होती. अखेर आज पासून त्यांना महाराष्ट्रात परत आणण्याची प्रक्रीया सुरु झाली आहे. आज जवळपास 150 खलाशी परतले असून त्यांना झाई येथील आश्रमशाळेत विलगीकरण करुन ठेवण्यात येणार आहे. या खलाशांसाठी आशागड आश्रमशाळांमध्ये देखील विलगीकरण कक्ष तयार करण्यात आले आहेत.
mahanews Loyal Readers Club चे सदस्य व्हा
❤️ 300 रुपये भरून आमचे ई वर्गणीदार बना! महत्वाच्या बातम्यांचे Updates मिळवा! त्यासाठी खालील Link ला Click करा! तुम्ही Paytm / Net Banking / Debit Card द्वारे पैसे अदा करु शकता
https://imjo.in/vq7QpV