मच्छीमारीसाठी बोटींवर खलाशी म्हणून गेलेल्या, आणि लॉक डाऊन मुळे समुद्रात वेरावळ (गुजरात) बंदरात फसलेल्या हजारो मच्छीमार बांधवांच्या अडचणी वाढल्या आहेत. काल (12 एप्रिल) रोजी, परतलेल्या 100/150 खलाशांना गुजरात मधून घेऊन आलेल्या वेरावळ कृपा या बोटीवर घोलवड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल खासदार राजेंद्र गावीत व माजी आमदार पास्कल धनारे यांच्या उपस्थितीत परतलेल्या या मच्छीमार बांधवांचा प्रवास अनधिकृत ठरला आहे. त्यामुळे समुद्रात उभ्या असलेल्या अन्य बोटींवरील मच्छीमारांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यांना आणखी काही दिवस प्रतिक्षा करावी लागणार आहे. सरकारने हा तिढा लवकरात लवकर सोडवावा, यासाठी बोटीत फसलेले लोक मोबाईलवरुन विविध सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधून आहेत. सर्व संबंधित त्यांना आश्वस्त करीत आहेत. समुद्रातील बोटींवर इतक्या मोठ्या संख्येने राहणे, त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने धोक्याचे ठरु लागले आहे.
या संदर्भातील बातम्या एकाच ठिकाणी वाचा: कोरोना संदर्भात दैनिक राजतंत्रच्या Updates साठी खालील Link ला भेट द्या! Let’s fight with CORONA
mahanewsLoyal Readers Club चे सदस्य व्हा! 300 रुपये भरून आमचे ई वर्गणीदार बना! महत्वाच्या बातम्यांचे Updates मिळवा! त्यासाठी खालील Link ला Click करा! तुम्ही Paytm / Net Banking / Debit Card द्वारे पैसे अदा करु शकता
https://imjo.in/vq7QpV
महाराष्ट्रात परतलेल्या मच्छीमारांवर कुठलीही कारवाई केलेली नसून, त्यांना जेथे असतील तेथे सुरक्षित ठेवण्याची संबंधित बोट मालकाची जबाबदारी होती. ती न पाळल्यामुळे, बोटीच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मच्छीमारांची आरोग्य तपासणी करुन त्यांच्या खाणे – पिणे व निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे!
सौरव कटीयार, सहाय्यक जिल्हाधिकारी (डहाणू)