कोरोना: पालघर जिल्ह्यात 14 दिवसांत 86 मृत्यू (वसई 60 / पालघर 18 / डहाणू 6 / वाडा 2 / विक्रमगड 1 / तलासरी 1) जव्हार व मोखाडा नियंत्रणात

0
3485

दि. 30 ऑगस्ट: पालघर जिल्ह्यात मागील 14 दिवसांत कोरोनामुळे तब्बल 86 मृत्यू झाले असून त्यातील 60 मृत्यू एकट्या वसई (वसई विरार महानगरपालिका क्षेत्र 46 + वसई ग्रामीण क्षेत्र 14) तालुक्यात झाले आहेत. त्या खालोखाल पालघर तालुक्यात 18 व डहाणू तालुक्यात 6 मृत्यू झाले आहेत. वाडा तालुक्यात 2 व विक्रमगड आणि तलासरी तालुक्यात प्रत्येकी 1 मृत्यू वाढला आहे. जव्हार व मोखाडा तालुक्यात मृत्यू वाढलेले नाहीत.

जिल्ह्यात आतापर्यंत 23 हजार 879 जणांना कोरोना संसर्ग झाला असून त्यातील 20 हजार 213 (84.65%) जण पूर्णत: बरे झाले आहेत. 3 हजार 181 रुग्णांवर उपचार चालू असून 485 (2%) जणांचा मृत्यू झाला आहे.

मृत्यूचा दर: वसई तालुक्याचा मृत्यूदर सर्वाधिक ठरला आहे. येथे निष्पन्न झालेल्या 17 हजार 119 जणांपैकी 380 (2.22%) जणांचा मृत्यू झाला आहे. पालघर तालुक्यात निष्पन्न झालेल्या 4 हजार 171 रुग्णांपैकी 69 (1.65%) जणांचा मृत्यू झाला आहे. डहाणू तालुक्यात निष्पन्न झालेल्या 1070 जणांपैकी 21 (1.96%) जणांचा मृत्यू झाला आहे. वाडा तालुक्यात निष्पन्न झालेल्या 759 रुग्णांपैकी 6 (0.79%) जणांचा मृत्यू झाला आहे. अन्य तालुक्यांचा मृत्यू दर पुढीलप्रमाणे आहे. विक्रमगड 5/250 (2%); जव्हार 2/236 (0.85%); तलासरी 2/165 (1.21%); मोखाडा तालुका 0/109 (0%)

जिल्ह्यात आतापर्यंत 1 लक्ष 36 हजार 393 जणांच्या चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्यातील 23 हजार 879 जणांचे (17.51%) कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले असून 1 हजार 195 जणांचे अहवाल अजून प्राप्त होणे बाकी आहे.

कोरोना संसर्ग झालेल्यां 23 हजार 879 जणांपैकी 17 हजार 119 रुग्ण (71.69%) वसई तालुक्यातील आहेत. त्या खालोखाल 4 हजार 171 (17.47%) रुग्ण पालघर तालुक्यातील आहेत. डहाणू तालुक्यात 1070 (4.48%) रुग्ण तर वाडा तालुक्यात 759 (3.18%) रुग्ण निष्पन्न झाले आहेत. विक्रमगड 250, जव्हार 236, तलासरी 165 व मोखाडा 109 अशी उर्वरीत 4 तालुक्यांची एकूण रुग्णसंख्या 760 (3.18%) इतकी आहे.