बोईसर : बेपत्ता झालेल्या तरुणाचा मृतदेह आढळला

0
3268

बोईसर, दि. 26 : मागील 4 दिवसापासून बेपत्ता असलेल्या बोईसर शहरातील अवधनगर येथील तरुणाचा आज, बुधवारी संध्याकाळी मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. शिवरत्न रॉय असे सदर तरुणाचे नाव असल्याची माहिती समोर आली असून बोईसर पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अवधनगर येथील रोशन गॅरेज गल्ली येथील रहिवासी असलेला शिवरत्न शनिवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास घराबाहेर पडला होता. त्यांनतर तो घरी परतलाच नाही. त्याच्या कुटुंबीयांनी बोईसर पोलीस स्टेशनमध्ये त्याच्या मिसिंगची तक्रार दाखल होती. पोलीस त्याचा तपास करत असतानाच आज संध्याकाळी तारापूर औद्योगिक वसाहतीला लागूनच असलेल्या गंगोत्री हॉटेल परिसरातील झाडाझुडुपांमध्ये सडलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला.

दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह ताब्यात घेतला असून अधिक तपास सुरू आहे.