

राजतंत्र न्युज नेटवर्क/पालघर दि. 15 : येत्या 21 ऑक्टोबर रोजी पार पडणार्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील 6 मतदारसंघातील एकुण 19 लाख 51 हजार 668 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार असुन 56 उमेदवार या निवडणुकीत आपले नशिब आजमावत आहेत. तर 24 ऑक्टोबर रोजी निवडणुकीचे निकाल जाहीर होणार आहेत.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार मतदारसंघ निहाय मतदार आकडेवारी पुढील प्रमाणे :
128 – डहाणू मतदारसंघ (अ.ज) :- पुरुष 1 लाख 37 हजार 227, स्त्रिया 1 लाख 34 हजार 838, इतर 4; एकूण 2 लाख 72 हजार 69.
129-विक्रमगड (अ.ज.) :- पुरुष 1 लाख 34 हजार 943, स्त्रिया 1 लाख 31 हजार 506, इतर 0; एकूण 2 लाख 66 हजार 449.
130-पालघर (अ.ज.):- पुरुष 1 लाख 39 हजार 174, स्त्रिया 1 लाख 34 हजार 803, इतर 17; एकूण 2 लाख 73 हजार 994.
131-बोईसर (अ.ज) :– पुरुष 1 लाख 71 हजार 302, स्त्रिया 1 लाख 44 हजार 72, इतर 26; एकूण 3 लाख 15 हजार 400.
132-नालासोपारा :- पुरुष 2 लाख 86 हजार 4, स्त्रिया 2 लाख 33 हजार 20, इतर 58; एकूण 5 लाख 19 हजार 82.
133-वसई :- पुरुष 1 लाख 57 हजार 70, स्त्रिया 1 लाख 47 हजार 592, इतर 12; एकूण 3 लाख 4 हजार 674.
10 लाख 25 हजार 720 पुरुष व 9 लाख 25 हजार 831 स्त्रिया व इतर 117 अशाप्रकारे एकूण 19 लाख 51 हजार 668 मतदार येत्या विधानसभा निवडणुकीत मतदान करतील.