
राजतंत्र न्यूज नेटवर्क/डहाणू दि. १७: बहुप्रतिष्ठीत अशा ॲडव्होकेट असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडियाच्या उपाध्यक्षपदी मुंबई उच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ नितीन गांगल यांची पुन्हा एकदा बिनविरोध निवड झाली आहे. सूमारे दीडशे वर्षांपूर्वी कर्नाटक ते सध्याच्या पाकिस्तानातील कराची पर्यंतच्या कार्यक्षेत्रासाठी स्थापन झालेल्या गौरवशाली परंपरा असलेल्या संघटनेच्या उपाध्यक्षपदी दुसऱ्यांदा निवड झाल्याबद्दल गांगल यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. गांगल हे मूळचे डहाणू तालुक्यातील आशागड या गावचे असल्याने त्यांच्या निवडीमुळे पालघर जिल्ह्यातील वकिलांचे संघटनेतील बळ वाढणार आहे.
नितीन गांगल हे मुंबई उच्च न्यायालयातील नामांकित वकिल गणले जात असून अनेक जनहित याचिकांमध्ये त्यांनी बाजू मांडली आहे. त्यांनी आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळांच्या दुरावस्थेविषयी मुंबई उच्च न्यायालयात बाजू मांडून अनेक आश्वस्त करणारे निकाल मिळवण्यात यश प्राप्त केले आहे. त्यांचे वडील व्ही. ए. उर्फ आबा गांगल हे देखील मुंबई उच्च न्यायालयातील नामांकीत विधिज्ञ आहेत. संघटनेचे अन्य पदाधिकारी पुढीलप्रमाणे: अध्यक्षपदी ॲड. संजीव कदम, महिलांसाठी राखीव असलेल्या अन्य उपाध्यक्षपदावर ॲड. अंजली हेलेकर, मानद सचिव पदावर ॲड. कुलदीप पाटील, सहसचिव पदावर ॲड. रूपेश बोंबाडे, तर कोषाध्यक्ष पदावर ॲड. गजानन सवगावे यांची निवड झाली आहे.
- आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
- दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
- स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!
ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा