राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत बी. आर. चव्हाण यांचा प्रथम क्रमांक

0
2417

राजतंत्र न्यूज नेटवर्क/डहाणू, दि. 13 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे चालू वर्षी शिक्षकांसाठी घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत येथील के. एल. पोंदा हायस्कुलचे शिक्षक बाळासाहेब रघुनाथ चव्हाण यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे.

या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेमध्ये एकूण पाच विषय होते. त्यांपैकी कोणत्याही एका विषयावर 3000 शब्दात स्वहस्ताक्षरात निबंध लिहायचा होता. चव्हाण यांनी शालेय शिस्तीच्या समस्या व उपाययोजना या विषयावर निबंध सादर केला होता. प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह व रोख बक्षीस रुपये पाच हजार असे पारितोषिकाचे स्वरूप आहे. गेल्या वर्षी देखील चव्हाण यांनी शिक्षकांनी तंत्रस्नेही होणे – काळाची गरज या विषयाचा निबंध सादर करुन प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळवले होते.

[divider]

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा