तलासरी येथे पत्रकारितेचे पदविका व पदवी अभ्यासक्रमांना मान्यता! जिल्ह्यातील पत्रकारांसाठी संधी उपलब्ध! M.A./M.B.A./M.Lib. हे पदव्युत्तर अभ्यासक्रम देखील उपलब्ध!

0
2743

दि. 19 सप्टेंबर 2020: पालघर जिल्ह्यातील तलासरी सारख्या आदिवासी भागात ल. शि. कोम अध्यक्ष असलेल्या गोदावरीताई परुळेकर महाविद्यालयात आता यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे पत्रकारितेतील पदविका व पदवी अभ्यासक्रम सुरु होत आहेत. परिस्थितीमुळे शालेय शिक्षण अर्धवट सोडलेल्या किंवा 10 वी / 12 वी नापास मात्र पत्रकारितेमध्ये कार्यरत असलेल्या किंवा पत्रकारिता करु इच्छिणाऱ्या व्यक्तींना पूर्वतयारी अभ्यासक्रम पूर्ण करुन हा अभ्यासक्रम करता येणार असल्याने पालघर जिल्ह्यात मोठी उपलब्धी निर्माण झाली आहे. ह्यापूर्वी दूरशिक्षण पद्धतीने पत्रकारिता अभ्यासक्रम शिकण्यासाठी लोकांना जिल्ह्याबाहेर प्रवेश घ्यावा लागत होता. ह्या शिवाय परुळेकर महाविद्यालयाने M.A. (Eng.), M.B.A. व M.Lib. हे पदव्युत्तर अभ्यासक्रम देखील सुरु केले आहेत. ह्या शैक्षणिक सुविधांचा अधिकाधिक लोकांनी लाभ घ्यावा असे आवाहन परुळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. ए. राजपूत व केंद्र संयोजक भास्कर गोतीस यांनी केले आहे.