केवळ हक्क मागत न बसता आपली योग्यता वाढवण्यावर भर द्या! – अजय भगत

0
1701
(विद्यार्थ्यांशी संवाद साधताना अजय भगत. सोबत सुधीर कामत.)

राजतंत्र न्युज नेटवर्क
कोसबाड, दि.४ केवळ हक्क मागत न बसता आपली योग्यता वाढवण्यावर भर द्या! स्वतःला समजून घ्या आणि स्वतःशी प्रामाणिक रहा, म्हणजे तुम्हाला करिअरसाठी योग्य दिशा मिळू शकेल असा सल्ला मनुष्यबळ विकास व्यवस्थापन तज्ञ अजय भगत यांनी कोसबाड येथे बोलताना दिला. ते अनुताई वाघ कनिष्ठ महाविद्यालयात (गुरुवार, दि. ३१) आयोजित मार्गदर्शन शिबिरात बोलत होते. यावेळी दैनिक राजतंत्रचे संपादक संजीव जोशी, सुधीर कामत, मुख्याध्यापक कदम उपस्थित होते.
आपल्याला अनेक गोष्टी हव्या असतात. मात्र त्या मिळवण्यासाठी आपण आपली पात्रता वाढवत राहिली पाहिजे. आणि स्वतःला समजून घेऊन, स्वतः प्रामाणिक राहून आपल्या आवडीचे क्षेत्र निवडले पाहिजे. एखादे मोठे क्षेत्र निवडले म्हणजे आपण यशस्वी होऊच असे नाही. तर त्या क्षेत्रासाठी आवश्यक तितकी क्षमता वृद्धिंगत करता आली पाहिजे असा मौलिक सल्लाही भगत यांनी दिला. भगत यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना विविध प्रश्न विचारुन बोलते केले.