पालघर, दि. 17 : जिल्हा माहिती कार्यालयाने आज, गुरुवारी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील (ग्रामीण) कोरोना रुग्णांचा आकडा 10 हजार 903 वर पोहोचला आहे. यापैकी 9 हजार 301 रुग्ण यशस्वी उपचारानंतर पुर्णपणे बरे झाले आहेत. तर 1414 रुग्णांवर उद्याप उपचार सुरु आहेत. दुर्दैवाने 188 रुग्णांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे.
- तुम्ही Youtube वर News Channel किंवा News Portal चालवता का? मग तुमच्यासाठी अतिशय महत्वाची बातमी आहे!
- केळवे समुद्रात चार मुलांचा बुडून मृत्यू!
- मुजोर विराज उद्योजका विरोधात कामगार आक्रमक
- घिवलीच्या पुनर्वसनाची मागणी
- महिलेला दोन लाखाचे सोन्याचे दागिने रेल्वे पोलिसांनी केले परत
जिल्हा माहिती कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, आज जिल्ह्यात 166 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असुन एकुण रुग्णांची संख्या 10 हजार 903 झाली आहे. आज पॉझिटिव्ह निष्पन्न झालेल्या 166 रुग्णांपैकी 76 रुग्ण पालघर तालुक्यातील तर 58 रुग्ण वाडा तालुक्यातील आहे. त्याखालोखाल डहाणूत 8, जव्हार 7, मोखाडा 3, वसई ग्रामीण 2 व तलासरी तालुक्यात 1 रुग्ण आढळून आला आहे.
- 519 ठिकाणे कन्टेमेंट झोन म्हणून जाहीर
जिल्ह्यातील विविध भागात कोरोना रुग्ण आढळून आलेली 519 ठिकाणे कन्टेमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आली आहेत. यात सर्वाधिक पालघरमधील 209, डहाणूमधील 88, वाड्यातील 83, विक्रमगडातील 52, जव्हारमधील 26, तलासरी व वसई ग्रामीणमधील प्रत्येकी 22 व मोखाड्यातील 17 ठिकाणांचा समावेश आहे.
आता पालघर मोठा हॉटस्पॉट
पालघर जिल्हा ग्रामीणमध्ये कोरोनाचा मोठा हॉटस्पॉट म्हणून कुप्रसिद्ध झालेल्या बोईसरमधील दैनंदिन आढळून येणारी रुग्णसंख्या मागील महिनाभरापासुन नियंत्रणात असल्याचे आकडे सांगतात. तर आता पालघर शहरात नियमित 30 ते 35 च्या आसपास रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे पालघर शहर जिल्ह्यातील नवे कोरोना हॉटस्पॉट ठरत आहे.