• 34 वर्षीय इसमाचा कोरोना अहवाल आला पॉझिटिव्ह
• कुटुंबातील 10 जणांना केले qurantine
• शहरात दैनंदिन आरोग्य सर्वेक्षण करण्याचा निर्णय
mahanews Loyal Readers Club चे सदस्य व्हा! 300 रुपये भरून आमचे ई वर्गणीदार बना! महत्वाच्या बातम्यांचे Updates मिळवा! त्यासाठी खालील Link ला Click करा! तुम्ही Paytm / Net Banking / Debit Card द्वारे पैसे अदा करु शकता.
https://imjo.in/vq7QpV
बोईसर, दि. 27 (सुशील बागूल) : शहरातील दलाल टॉवर भागातील एका 34 वर्षीय तरुणाचा कोरोना (कोविड-19) अहवाल पॉझिटिव्ह आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. त्याच्यावर पालघर ग्रामीण रुग्णालयात अधिक उपचार सुरू आहेत. सदर इसमाने काही दिवसांपूर्वी मुंबई येथे प्रवास केल्याचा इतिहास असल्याने तेथूनच त्याला कोरोनाची लागण झाल्याचा अंदाज आहे. दरम्यान त्याच्या कुटुंबातील 10 जणांच्या घशातील स्त्रावाचे नमुने तापसणीसाठी घेण्यात आले असुन येत्या 48 तासात त्यांचे अहवाल प्राप्त होणार आहेत. तसेच त्याच्या संपर्कात आलेल्या इतर लोकांचाही शोध घेण्याची प्रक्रिया प्रशासनामार्फत सुरु करण्यात आल्याचे समजते. या तरुणामध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आल्याने त्याची चाचणी करण्यात आली. या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यानंतर सदर तरुणाला पालघर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तेथे त्याच्यावर अधिक उपचार सुरु आहेत.
कुटुंबातील 10 जणांचे नमुने तापसणीसाठी पाठवले!
सदर तरुणाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याच्या कुटुंबातील १० सदस्यांना quarantine करण्यात आले असून त्यांच्या घशाच्या स्त्रावाचे नमुने तापसणीसाठी पाठवण्यात आले आहेत. येत्या 48 तासात त्यांचा अहवाल प्राप्त होणार असल्याचे समजते. तसेच या तरुणाच्या संपर्कात आलेल्या इतर लोकांचाही शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे.
500 मीटरचा परिसर सील!
बोईसर शहरात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर स्थानिक प्रशासन खडबडून जागे झाले असून पोलीस विभागासह संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची तातडीची बैठक पार पडली. या बैठकीत शहरात कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाय योजना राबविण्याबाबत चर्चा करण्यात आली. त्यानुसार रुग्ण आढळलेल्या भागापासूनचा 500 मीटरचा परिसर आज दुपारच्या सुमारास सील करण्यात आला.
आरोग्य सर्वेक्षण होणार!
शहरात रुग्ण सापडल्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागामार्फत दैनंदिन आरोग्य सर्वेक्षण तसेच तपासणी करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करून आपल्यात ताप, सर्दी, खोकला किंवा अन्य कोणतीही लक्षणे आढळल्यास सर्वेक्षण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कळवावे असे आवाहन करण्यात आले आहे.
नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन!
संपूर्ण देशभरात लॉकडाउन पाळला जात असताना बोईसर शहरात मात्र काही नागरिक विनाकारण रस्त्यावर फिरताना आढळत होते. आता मात्र शहरात कोरोनाचा रुग्ण आढळल्यानंतर प्रशासन जागे झाले असून अत्यंत आवश्यक असल्यासच घराबाहेर पडावे अन्यथा घराबाहेर पडू नये असे आवाहन बोईसर पोलिसांमार्फत करण्यात आले आहे.
माननीय मुख्यमंत्री, पालघर जिल्ह्यात All is NOT Well! SP गौरव सिंगांची उचलबांगडी करा!