आर्थिक दृष्ट्या मागास उमेद्वारांना कर्ज देण्यास बॅंकांनी सहकार्य करावे – किरण पटवर्धन यांचे आवाहन

0
1551

mahanews_EPAPER_200418_4_040420

राजतंत्र न्युज नेटवर्क
              पालघर, दि. १९ : आर्थिकदृष्ट्या मागास उमेदवारांना बॅंकांतर्फे स्वयंरोजगारासाठी कर्ज देण्यात येते. हि कर्ज प्रकरणे निकाली काढताना बॅंकांनी सहकार्य करावे, असे आवाहन आणा साहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे निरीक्षक किरण पटवर्धन यांनी केले.
आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य विकास अभियानाच्या माध्यमातून लाभार्थी व बॅंक यांच्या मध्ये समन्यव साधण्यासाठी आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. या बैठकीत पटवर्धन यांनी सर्व बॅंकांच्या अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. लाभार्थ्यांची कर्जाची सविस्तर प्रकरणे जिल्हा अग्रणी बॅंकांकडे पाठवूनत्यांची पूर्तता झाल्यानंतर महामंडळाकडे सादर करावी यासाठी महामंडळ सहकार्य करेल. तसेच बॅंकांनी सुद्धा सहकार्य करावे अश्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. तर कर्जप्रकरणाची परतफेड करताना काही लाभार्थी पूर्णपणे परतफेड करीत नाहीत त्यामुळे बॅंकांना कर्ज देताना अडचणी येतात. अशी समस्या बॅंकांच्या आदिकार्यांनी बोलून दाखवली. यावर पटवर्धन म्हणाले कि आपल्याकडे जी प्रकरणे येतील त्यांची सखोल तपासणी करून संबंधित लाभार्थी खरोखरच होतकरू असेल आणि तो संबंधित परतफेड करून व्यवसाय चांगल्याप्रकारे करत असेल तर बॅंकांना कर्ज देण्यास अडचण येणार नाही. यावेळी त्यांनी बॅंकेचे पदाधिकारी व लाभार्थ्यांच्या अडीअडचणी समजावून घेऊन त्यावर मार्गदर्शन केले.
या बैठकीनंतर पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कोईशल्य विकास अभियानाच्या माध्यमातून आर्थिक विकास मागास समाजातील तरुणांसाठी व्याज परताव्याच्या ३ योजना राबविण्यात येणार आहेत. आर्थिकदृष्ट्या मागास उमेदवारांना बॅंकेतर्फे स्वयंवरोजगार उभारणीकरिता जे कर्ज दिले जाईल त्या कर्ज रकमेवरील १२ टक्के पर्यंतच्या व्याजाचा परतावा हा महामंडळाकडून देण्यात येणार आहे. कर्जाची मर्यादा १० लाखापर्यंत आहे. तर दुसऱ्या योजनेत बचतगट, संस्था, भागीदारी संस्था, सहकारी संस्था, कंपनी याना गटकर्ज व्याज परतावा योजना राबिवण्यात येणार आहे. तिसऱ्या योजना शेतकरी उत्पादन गटासाठी असून गट प्रकरण कर्ज योजनेतून बिनव्याजी १० लाखांपर्यंतचे कर्ज देण्यात येणार आहे. त्याचबरोबर शेतक्र्यांच्या मुलांना शेतीविषयक तंत्रशिक्षण देण्यात येणार आहे. या चारही योजनांची सुरुवात २ फेब्रुवारीपासून झाली असून सर्व योजना www.mahaswayam.in या संकेत स्थळामार्फत राबविण्यात येत आहेत. असीझी माहिती देखील देण्यात आली