
राजतंत्र न्यूज नेटवर्क/विक्रमगड, दि. १३: येथील होमिओपॅथी वैद्यकीय व्यावसायिक डॉ. दिगंबर पुरुषोत्तम जेठे यास वनविभागाच्या अधिकाऱ्याला 3 लाख रुपयांची लाच देताना अटक करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पालघर युनिटने सापळा रचून ही कारवाई केली.
जेठे याने वनविभागाच्या मालकीच्या जागेत बांधकाम केले होते. ही बांधकामे पाडून टाकण्याची कारवाई करु नये याकरिता जेठेने वन विभागाच्या अधिकाऱ्याला 3 लाख रुपयांचे आमिष दाखविले. याबाबत प्रामाणिक वनाधिकाऱ्याने काल (१२) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार आज दुपारी १.१५ वाजता पोलीस निरीक्षक एम. ए. वाघमारे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सापळा रचून जेठे यास 3 लाख रुपये देताना ताब्यात घेतले. पोलीस उप अधिक्षक अजय आफळे याप्रकरणी पुढील तपास करीत आहेत
- आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
- दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
- स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!
ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा