
राजतंत्र न्यूज नेटवर्क/जव्हार, दि. 16 : मागील काही दिवसांपासुन जव्हार एकात्मिक आदिवासी प्रकल्पात झालेले कोट्यावधींचे घोटाळे एकामागोमाग एक उघडकीस येत असुन काल, सोमवारी आणखी दोन घोटाळ्यांप्रकरणी संबंधित अधिकार्यांविरोधात गुन्हे नोंदवण्यात आले आहेत
संबंधित बातमी :- आदिवासींच्या विकासाच्या नावावर भ्रष्ट्राचार, खाटीकसह बड्या अधिकार्यांवर गुन्हे दाखल
सन 2006 ते 2008 दरम्यान आदिवासी शेतकर्यांसाठी राबविण्यात आलेली लघु उपसा सिंचन योजना व दुधाळ जनावरे वाटप योजनेत हे घोटाळे झाले असुन संबंधित अधिकार्यांनी या योजनांमध्ये लाखोंचा गैरव्यवहार केल्याचे उघडकीस आले आहे. जव्हार आदिवासी विकास प्रकल्पाच्या सहाय्यक प्रकल्प अधिकार्यांनी याबाबत जव्हार पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली असुन लघु उपसा सिंचन योजनेत 10 लाखांचा तर दुधाळ जनावरे वाटप योजनेत 7 लाख 53 हजार रुपयांचा घोटाळा झाल्याचे तक्रारीत नमुद करण्यात आले आहे.
याप्रकरणी पोलिसांनी संबंधित अधिकार्यांविरोधात भारतीय दंड विधान संहितेचे कलम 420 व 409 नुसार गुन्हा दाखल केला असुन अधिक तपास सुरु आहे.