आचारसंहिता भंग प्रकरणी गुन्हा दाखल

0
1389

राजतंत्र न्यूज नेटवर्क/पालघर दि. 15 : जव्हार पोलिस ठाणे हद्दीत जुनीजव्हार ग्रामपंचायत येथील प्रकृती रिसॉर्ट येथे वेगवेगळ्या राजकीय पक्षातील कार्यकर्ते काशिनाथ पाटील, दत्तात्रेय यशवंत घेगड, हेमंत गोविंद, सुनिल भुसारा, रियाज नियार, दिलिप तेंडूलकर, संतोष भट्टड (व्यवस्थापक प्रकृती रिसॉर्ट) यांनी एकत्र येऊन 129 विक्रमगड विधानसभा यांची कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता दिनांक 02/04/2019 रोजी सभा आयोजित केल्याने त्यांचेविरूद्ध आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याबाबत गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे. जव्हार पोलिस ठाणे येथे भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 प्रमाणे हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.