पालकांनी मुलांशी भाषा व साहित्याविषयी संवाद साधायला हवा! – डॉ. अरूणा ढेरे

0
2477
page4राजतंत्र न्युज नेटवर्क 
पुणे दि. 27: शिक्षक व पालकांसाठी साहित्य व मराठी भाषा हे विषय जिव्हाळ्याचे असले पाहिजेत. पालकच मुलांसमोर हातात मोबाईल घेऊन बसत असतील तर मुलंही त्यातच रमतील. मुलांना भाषेची गोडी लावायची असल्यास आधी पालकांनी हातात पुस्तक घ्यायला हवे. भाषा व साहित्याविषयी मुलांशी संवाद साधायला हवा, असे आवाहन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. अरूणा ढेरे यांनी पुणे येथे बोलताना केले. विवेक समुह, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, टी. बी. मुल्ला चॅरिटेबल फाऊंडेशन आणि शिक्षणविवेक यांच्या वतीने आयोजित शिक्षण माझा वसा या कार्यक्रमात रविवारी डॉ. ढेरे यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी सोसायटीचे अध्यक्ष निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले,  माजी खासदार प्रदीप रावत, फाऊंडेशनचे अध्यक्ष अ‍ॅड. किशोर लुल्ला, सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीव सहस्त्रबुध्दे, माजी प्राचार्य डॉ. अनिरूध्द देशपांडे, नितीन शेटे, साप्ताहिक विकेच्या संपादक अश्विनी मयेकर, शिक्षणविवेकच्या कार्यकारी संपादिका डॉ. अर्चना कुडतरकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमामध्ये उपक्रमशील शिक्षक व मुख्याध्यापकांना राज्यस्तरीय युवा शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
डॉ. ढेरे पुढे म्हणाल्या, मराठी शाळा, मराठी भाषा जिवंत राहावी यासाठी शासनाने, शिक्षकांनी प्रयत्न करावेत, अशी सगळ्यांची अपेक्षा असते. पण एक सामान्य माणूस, पालक म्हणून आपण आपल्या भाषेवर किती प्रेम करतो. या भाषेमध्ये किती बोलतो, किती वापर करतो? याचाही विचार करायला हवा. सर्वांनीच आपल्या भाषेकडे जागृतपणे पाहण्याची गरज आहे. केवळ प्रादेशिक भाषा वर्ष साजरे करून चालणार नाही. मुलांना भाषेची गोडी लावायची असेल तर पालक आणि शिक्षकांची भुमिका महत्वाची आहे. भाषेकडे जाणिवपुर्वक पाहायला हवे. पालकांनी पुस्तक हातात घेतले, मुलांशी संवाद साधला तर त्यांनाही गोडी लागले. त्यामुळे पालक व शिक्षकांनी मराठी भाषेकडे, बोली भाषांकडे प्रेमाने, जागृतपणे पाहणे आवश्यक आहे. शिक्षक, पालक विद्यार्थ्यांमध्ये समन्वय असायला हवा. आपण समाजासाठी जेवढे करू तेवढे कमीच आहे. पण हे कार्य करत असताना आपले पाय नेहमी जमीनीवर हवेत, अशी अपेक्षा गोखले यांनी व्यक्त केली.

[divider]

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा