दि. 22: परराज्यातील मजूराला लाथ मारणारे पालघरचे तहसिलदार सुनील शिंदे यांना रजेवर पाठविण्यात आले आहे. मुंबई उप नगर जिल्ह्यातील तहसिलदार अयुब तांबोळी यांच्याकडे पालघर तालुक्याचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. कोकण विभागाचे आयुक्त शिवाजी दौंड यांनी आज उशीरा आदेश काढला आहे.